लातूर, शिरुर ताजबंद, चापाेलीतून दुचाकी पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:09+5:302021-03-06T04:19:09+5:30
पाेलिसांनी सांगितले की, लातुरातील न्यू भाग्यनगरात राहणाऱ्या अजय शेषराव शिंदे याने आपल्या ताब्यातील माेटारसायकल (क्र.एम.एच. २४ बी.जे. ८५३२) घरासमाेर ...

लातूर, शिरुर ताजबंद, चापाेलीतून दुचाकी पळविल्या
पाेलिसांनी सांगितले की, लातुरातील न्यू भाग्यनगरात राहणाऱ्या अजय शेषराव शिंदे याने आपल्या ताब्यातील माेटारसायकल (क्र.एम.एच. २४ बी.जे. ८५३२) घरासमाेर थांबविली हाेती. दरम्यान, झाेपेतून उठून पाहिले असता, ती अज्ञात चारेट्याने पळविल्याचे आढळून आले. सदर घटना १ मार्च राेजीच्या रात्री घडली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथील बसस्थानकात फिर्यादी नरसिंग रामकिशन काळे (वय ३५, रा. शिवणखेड) यांनी आपल्या ताब्यातील काळ्या रंगाची माेटारसायकल (क्र.एम.एच. २४ ए.इ. ६८८६) थांबविली हाेती. दरम्यान, ती अज्ञाताने पळविल्याची घटना २ मार्च राेजी घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तिसऱ्या घटनेत, रेणापूर तालुक्यातील हाणमंतवाडी येथील फिर्यादी महेश ज्ञानाेबा काेल्हे यांनी आपल्या ताब्यातील माेटारसायकल (क्र.एम.एच. २४ ए.के. ९२५२) चाकूर तालुक्यातील चापाेली येथे मामाच्या घरासमाेर थांबविली हाेती. ती अज्ञात चाेरट्याने पळविली. सदर घटना २७ ते २८ फेब्रुवारीच्या रात्री घडली. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दररोज दाेन दुचाकींची चाेरी...
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज सरासरी दाेन ते तीन दुचाकी पळविण्याच्या घटना घडत आहेत. हे सत्र गेल्या वर्षभरापासून सुरू असून, वर्षभरात जवळपास १ हजार दुचाकी चाेरीला जात असल्याचे समाेर आले आहे. यातील चाेरट्यांचा, टाेळीच्या म्हाेरक्याचा सुगावा मात्र, लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आता दुचाकीचाेरी हा नित्याचाच प्रकार झाला आहे. दुचाकीसह इतर चाेरींच्या घटनातही अलीकडे वाढ झाली आहे. याबाबत नागरिक मात्र, कमालीचे त्रस्त झाले आहेत.