मोतीनगर, गंजगोलाई परिसरातून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:41+5:302020-12-05T04:31:41+5:30
लातूर जिल्ह्यातील जमालपूर येथील राजेंद्र दत्तात्रय एकंबे यांनी एम.एच.२४ एस. ३५२४ या क्रमांकाची दुचाकी गंजगोलाई परिसरात पार्किंग केली होती. ...

मोतीनगर, गंजगोलाई परिसरातून दुचाकीची चोरी
लातूर जिल्ह्यातील जमालपूर येथील राजेंद्र दत्तात्रय एकंबे यांनी एम.एच.२४ एस. ३५२४ या क्रमांकाची दुचाकी गंजगोलाई परिसरात पार्किंग केली होती. त्यानंतर ते एका दुकानात कामानिमित्त गेले. काम संपल्यानंतर परत आले असता त्यांची दुचाकी पार्किंग केलेल्या जागी दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ. जाधव करीत आहेत.
दुसरी घटना मोतीनगर येथील मार्केट यार्डातील गेट नंबर ४ येथे घडली. तांदळवाडी येथील समाधान ज्ञानोबा गोमसाळे यांनी आपली एम.एच.२४ क्यू ४२२५ या क्रमांकाची दुचाकी मार्केट यार्डातील गेट क्रमांक चार या ठिकाणी पार्किंग करून बाजारात गेले होते. बाजारातील काम संपल्यानंतर ते परत आले असता दुचाकी पार्किंग केलेल्या ठिकाणी दिसली नाही. या दुचाकीची चोरी झाली. याबाबत समाधान गोमसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनगांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास गोसावी करीत आहेत.