निलंग्यात काँग्रेसची दोन वेगवेगळी आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:53+5:302021-06-09T04:24:53+5:30
निलंगा : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने सोमवारी निलंग्यात आंदोलन करण्यात आले. यातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, काँग्रेसची दोन ...

निलंग्यात काँग्रेसची दोन वेगवेगळी आंदोलने
निलंगा : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने सोमवारी निलंग्यात आंदोलन करण्यात आले. यातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, काँग्रेसची दोन वेगवेगळी आंदोलने झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा वाढली आहे.
केंद्र सरकारचा निषेध करत पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी करत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर - बिदर मार्गावरील जाऊ येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, दयानंद चोपणे, सुरेंद्र धुमाळ, अशोक शेटगार, सोनाजी कदम, विठ्ठल पाटील, गंगाधर चव्हाण, राम पाटील, व्यंकट काळगे, दिलीप हुलसुरे, माधव कांबळे, अजय कांबळे, विजय वडजे, अजहर मुल्ला, जफर शेख, प्रकाश बाचके, हरी बिरादार, प्रकाश झरकर, विलास मुगळे, बालाजी भुरे, रोहन सुरवसे, सुदाम सलघंटे, अंबादास देशपांडे, महेश चिकराळे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, काँग्रेसचे अभय सोळंके यांनी इंधन दरवाढ तत्काळ कमी करावी, या मागणीसाठी शहरातील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे, माधवराव पाटील, महेश देशमुख, अजगर अन्सारी, उपसरपंच मदन बिरादार, सिद्धेश्वर बिरादार, सोमनाथ कदम, जगदीश सगर, प्रकाश स्वामी, गिरीश पात्रे, मारुती गायकवाड, शरद माने जवळगेकर, तुराब बागवान, सुभाष नाईकवाडे, धनाजी चांदुरे, तुळशीदास साळुंके, डॉ. बलभीम सूर्यवंशी, मनोज बिरादार, आदी उपस्थित होते.
निलंग्यात काँग्रेसची दोन आंदोलने झाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला होता.