दोन लाखांचे चंदन अन् बैलजोडी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:31+5:302021-09-19T04:21:31+5:30

होसूर येथील दत्तात्रय माधवराव बगदुरे यांच्या शेतातील दोन चंदनाची झाडे १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते १६ सप्टेंबर सकाळी ...

Two lakh sandalwood and oxen were stolen | दोन लाखांचे चंदन अन् बैलजोडी पळविली

दोन लाखांचे चंदन अन् बैलजोडी पळविली

होसूर येथील दत्तात्रय माधवराव बगदुरे यांच्या शेतातील दोन चंदनाची झाडे १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते १६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तोडून नेली. त्याची किंमत जवळपास दोन लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच झटिंग श्रीमंत बिरादार यांच्याही शेतातील चंदन चोरी झाली असल्याचे सांगण्यात आले. हलगरा येथील शेतकरी फारूक अहेमद अब्दुलखादर देशमुख यांच्या शेतात शेडमध्ये बांधलेली बैललोडी १६ सप्टेंबर रोजी चोरट्यांनी पळविली. त्याची किंमत जवळपास १ लाख २० हजार रुपये असल्याची नोंद आहे. औराद शहाजानी परिसरात मोटारसायकल चोरीसह इतर चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांनी येथील पोलीस प्रशासनास आव्हान दिले असल्याचे नागरिकांतून चर्चिले जात आहे .

याप्रकरणी शेतकरी दत्तात्रय माधवराव बिरादार व फारूक अहेमद देशमुख यांच्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सौदागर करीत आहेत.

Web Title: Two lakh sandalwood and oxen were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.