शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लातूर शहरात दररोज दोनशे टन नवा कचरा; विल्हेवाट नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग

By हणमंत गायकवाड | Updated: April 1, 2024 19:39 IST

तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासन आणि जनाधार संस्थेची संयुक्त बैठक

लातूर : शहरात दररोज २०० टन नवा कचरा निर्माण होत असून या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मनपा प्रशासन आणि कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेची संयुक्त बैठक नुकतीच झाली असून आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासंदर्भात तोडगा काढण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग आठ दिवसांत साफ करण्यासंदर्भात संस्थेला सूचित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने काम करायला प्रारंभ झाला आहे.

लातूर शहरामध्ये ७८ हजार मालमत्ताधारकांची संख्या होती. ती आता सव्वालाखाच्या घरात गेली आहे. ४८ हजार घरे वाढीव झाली आहेत. यामुळे कचरा वाढला आहे. कचरा वाढल्यामुळे व्यवस्थापन संस्थेवरचा ताण वाढला आहे. ज्या तुलनेत कचरा वाढला. त्या तुलनेत संस्थेकडे मनुष्यबळाची वाढ झालेली नाही. परिणामी, शहरातील कचरा उचलताना अनियमित आली आहे. यामुळे कचरा उचलणारी संस्था आणि मनपा प्रशासनात वाद निर्माण झाला होता.

गल्लीबोळातल्या मोकळ्या जागेत साचला कचरा... लातूर शहरानजीक गेलेल्या रिंगरोड तसेच बार्शी रोडच्या समांतर रस्त्यावर, दयानंद महाविद्यालयाच्या बाजूने असलेल्या भाजीपाल्याच्या रयतू बाजारात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे गल्लीबोळातल्या मोकळ्या जागेतही कचरा साचलेला आहे. कचरा जाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यावरही कारवाईसाठी पथक नियुक्त करण्यात आले आहेत; पण त्याआगोदर घरोघरी निर्माण होणारा कचरा नियमित उचलणे आवश्यक आहे.

आठ दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देशशहरातला कचरा संकलन करताना अडचणी आल्या होत्या; मात्र आता त्या दूर झाल्या असून, संबंधित संस्थेला आठ दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देश बैठक घेऊन देण्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापनाबाबतचे निवडणुकीनंतर त्याबाबतची प्रक्रिया होऊ शकते. प्राप्त स्थितीत जुन्या संस्थेकडे कचरा व्यवस्थापनाचे काम आहे.- रमाकांत पिडगे, स्वच्छता विभागप्रमुख मनपा

आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन पूर्वपदावरआठ हजार रुपये वेतनावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. आमच्या काही मागण्या महानगरपालिका प्रशासनाकडे होत्या. त्यातील काही मागण्यांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शहरात कचरा वाढलेला आहे. त्याबाबतचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जाईल. आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन पूर्वपदावर येईल.- संजय कांबळे, जनाधार संस्था, लातूर

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिका