दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:47+5:302021-02-26T04:26:47+5:30
राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद ...

दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा
राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधून नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये माॅस्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, अनावश्यक गर्दी टाळणे, स्वच्छतेचे नियम पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदींचा समावेश आहे; परंतु काही नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.
येथील तहसीलदार अतुल जटाळे यांनी गुरुवारी कोरोना नियंत्रण समितीची बैठक घेऊन जनता कर्फ्यूबाबत माहिती दिली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांनी नियमाचे पालन करावे, अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते. या बैठकीसाठी नायब तहसीलदार सुधीर बिरादार, आर.एन. पत्रिके यांची उपस्थिती होती.
मी जबाबदार मोहीम...
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी, ही मोहीम राबविली होती. आता मी जबाबदार, ही नवी मोहीम सुरू केली आहे. शनिवार, रविवारी बहुतांश सरकारी, निमसरकारी कार्यालये बंद असतात. नागरिकांनी जनता कर्फ्यूमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार जटाळे यांनी केले आहे.