दोन बँकांचे एटीएम, एका व्यापाऱ्याचे गोडावून सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST2021-02-23T04:30:01+5:302021-02-23T04:30:01+5:30
लातूर : वारंवार सूचना करून आणि नोटीस देऊनही मालमत्ता कर भरला जात नसल्यामुळे महापालिकेने दोन बँकांचे एटीएम आणि एका ...

दोन बँकांचे एटीएम, एका व्यापाऱ्याचे गोडावून सील
लातूर : वारंवार सूचना करून आणि नोटीस देऊनही मालमत्ता कर भरला जात नसल्यामुळे महापालिकेने दोन बँकांचे एटीएम आणि एका व्यापाऱ्याचे गोडावून सील केले. महानगरपालिकेने शहरात वसुली मोहीम सुरू केली आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर व पाणीपट्टी थकीत आहे. त्याची वसुली करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कर थकलेला आहे, त्यांना पालिकेकडून वारंवार नोटीस दिल्या जात आहेत. सोमवारी एका कारवाईत दोन बँकांचे एटीएम व एक गोडावून सील करण्यात आले. शहरात असलेल्या दोन खासगी बॅंकांकडे मालमत्ता कर थकला आहे. त्यामुळे या दोन्ही बँकांचे एटीएम सील करण्यात आले. नांदेड रस्त्यावरील एका ट्रेडर्सच्या मालकाकडेही मोठ्या प्रमाणात कर थकलेला असल्यामुळे त्यांचेही गोडावून सील करण्यात आले. पालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘झोन सी’चे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी, वसुली लिपिक दिलीप कांबळे, कर्मचारी ज्ञानेश्वर शिवपर्वते, सुमीत शिंदे, अकबर शेख, राधाकिशन बायस, अली चाऊस, गोविंद वाकडे यांनी ही कारवाई केली.