अडीच हजार परीक्षार्थींची एमपीएससी परीक्षेकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:10+5:302021-03-22T04:18:10+5:30
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला ...

अडीच हजार परीक्षार्थींची एमपीएससी परीक्षेकडे पाठ
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर संताप व्यक्त करीत परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नवीन तारीख जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी शहरातील १९ केंद्र होती. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी प्रशासन आणि केंद्राकडून घेण्यात आली होती. परीक्षार्थीस मास्क, सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण ७ हजार ८९० परीक्षार्थी होते. त्यापैकी ५ हजार २९८ परीक्षार्थींनी उपस्थित राहून परीक्षा दिली. २ हजार ५९२ परीक्षार्थी गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले.
शांततेत परीक्षा...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली होती. १९ केंद्रांवरून ५ हजार २९८ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. २ हजार ५९२ जण गैरहजर राहिले, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी सांगितले.