जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पथकाने कातपूर रोड येथे सापळा रचून आरोपी विश्वजीत अभिमन्यू देवकते (रा. कातपूर, जि. लातूर) व यशोधन केशवराव कातळे (रा. गरसोळी ता. रेणापूर ह.मु. शिवाजीनगर, लातूर) यांना पकडले. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक विनापरवाना गावठी पिस्टल आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी सदरचा पिस्टल पंकज श्यामसुंदर पारिख यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी दोघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवकते याच्यावर जबरी चोऱ्यांचे गुन्हे
आरोपी विश्वजीत देवकते हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विवेकानंद चौक, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या जबरी चोऱ्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी यशोधन कातळे याच्याविरुद्ध दुचाकी चोरीचे गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.