शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या प्रवाशांसाठी बारा रेल्वेगाड्या सुसाट; देशाच्या कानाकाेपऱ्यांत सहज पोहचता येणार!

By राजकुमार जोंधळे | Updated: December 7, 2022 19:24 IST

लातूरच्या प्रवाशांना देशाच्या कानाकाेपऱ्यांत सहज प्रवास करता येणार आहे. 

लातूर : कोरोना काळात माेजक्याच धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर गैरसाेय झाली. त्यातून अनेकांनी खासगी ट्रॅव्हल्स, वाहनांचा आधार घेत प्रवास केला. मात्र, काेराेना ओसरल्यानंतर रेल्वे विभागानेही टप्प्या-टप्प्याने रेल्वे सुरू केलेल्या आहेत. एकट्या लातूर स्थानकातून सध्याला जवळपास १२ रेल्वेगाड्या धावत आहेत. त्याबाबचे वेळापत्रक रेल्वे विभागाने जाहीर केले आहे. त्यातून लातूरच्या प्रवाशांना देशाच्या कानाकाेपऱ्यांत सहज प्रवास करता येणार आहे. 

लातूर रेल्वेस्थानकातून नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यामध्ये लातूर-पुणे-मुंबई, बीदर-लातूर-मुंबई, हडपसर-लातूर-हैदराबाद, निजामाबाद-लातूर-पंढरपूर, मिरज-लातूर-परळी वैजनाथ, काेल्हापूर-लातूर-नागपूर, काेल्हापूर-लातूर-धनाबाद, नांदेड-लातूर-पनवेल, यशवंतपूर-लातूर आणि अमरावती-लातूर-पुणे यांचा समावेश आहे. दरराेज रात्रीच्या वेळी लातूर येथून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ हाेणाऱ्या रेल्वेत लातूर-मुंबईचा समावेश आहे. आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या रेल्वेत बिदर-मुंबईचा समावेश आहे. त्याचबराेबर दरराेज धावणाऱ्यांमध्ये मिरज-परळी, निजामाबाद-पंढरपूर, हडपसर-हैदराबाद या रेल्वेंचा समावेश आहे.

आठवड्यातून तीन दिवस यशवंतपूर-लातूर एक्स्प्रेस...लातूर रेल्वेस्थानकातून यशवंतपूरसाठी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे आठवड्यातील तीन दिवस धावणार आहे. या रेल्वेला प्रवाशांचा माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

नागपूर, धनबादसाठी लातुरातून रेल्वेची साेय...काेल्हापूर येथून धावणाऱ्या दाेन एक्स्प्रेस गाड्यांचे नियाेजन रेल्वेने केले आहे. काेल्हापूर-नागपूर ही रेल्वे आठवड्यातून दाेन दिवस धावते तर काेल्हापूर-धनाबाद ही रेल्वे आठवड्यातून एकच दिवस धावते. या रेल्वेलाही प्रवाशांचा माेठा प्रतिसाद आहे. या दाेन्ही रेल्वे लातूर स्थानकातून धावतात.

 

टॅग्स :laturलातूरrailwayरेल्वे