दहा महिन्यानंतर पाचवीच्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:05+5:302021-02-05T06:24:05+5:30
पहिला दिवस मज्जेचा.. तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरु झाल्या. दोन दिवसांपासून शाळेत जाण्याची उत्सुकता होती. शाळेमध्ये मित्रांना भेटता आले, ...

दहा महिन्यानंतर पाचवीच्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट
पहिला दिवस मज्जेचा..
तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरु झाल्या. दोन दिवसांपासून शाळेत जाण्याची उत्सुकता होती. शाळेमध्ये मित्रांना भेटता आले, मनसोक्त बोलता आले. नियमितपणे शाळेला हजर राहणार असून, अभ्यास पुर्ण करणार आहे. - तुषार चिटबोणे, विद्यार्थी
शाळेत जाण्यास आई-वडीलांची परवानगी होती. मास्क, फिजीकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करीत शाळेस उपस्थित राहीलो. मित्रांना भेटल्याचा आनंद होत आहे. शाळा पुर्ववत सुरु झाल्याचा आनंद आहे.- पार्थ पवार, विद्यार्थी
शिक्षकांच्या प्रतिक्रीया...
शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यात आले. शाळेच्या प्रवेशाद्वारावर थर्मल स्क्रीनींग करण्यात आले. योग्य खबरदारी घेत वर्ग सुरु करण्यात आले असून, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - श्रीनिवास जाधव, शिक्षक
वर्गामध्ये विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सबाबत सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली असून, अभ्यासक्रम पुर्ण करण्यावर आमचा भर आहे. - संजय मुळे, शिक्षक
फोटो कॅप्शन : दहा महिन्यानंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु झाल्या असून, नियमांचे पालन करीत विद्यार्थी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी उपस्थिती...
विद्यार्थी - ७८६५३
शिक्षक - ३६५०
शाळा सुरु - १९२६
शिक्षकांच्या चाचण्या - २७७०
पॉझिटिव्ह शिक्षक - ४३