मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:51+5:302021-06-09T04:24:51+5:30

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत पिरुपटेलवाडी, कासार बालकुंदा, ममदापूर, तांबाळा व तांबाळवाडी या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी आ. पवार यांनी ...

Turn to horticulture under MGNREGA scheme | मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकडे वळावे

मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकडे वळावे

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत पिरुपटेलवाडी, कासार बालकुंदा, ममदापूर, तांबाळा व तांबाळवाडी या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी आ. पवार यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शेतक-यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा उपयोग करावा. लातूर जिल्ह्यामध्ये सात प्रकारचे फळबाग लागवडीसाठी जमीन योग्य असून त्यामध्ये आंबा, सीताफळ, चिकू, पेरू,डाळिंब, कागदी लिंबू आदी पिके आहेत. मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे घेऊन आपली जमीन ओलिताखाली आणता येते. असेही आ. पवार म्हणाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, पोलीस निरीक्षक रेवननाथ डमाले, सुनिल मुगळे, एच.एम. पाटील, मंडळाधिकारी निटुरे, ग्रामसेवक राजेंद्र धर्मशेट्टी, माडीबोने महादेव, शरद ढविले, कलबोने, ज्ञानेश्वर वाकडे, नितीन पाटील, प्रदीप कोडे, गोरोबा पेटकर, अभियंता गिरी, मनोहर मोरे, गोपाळे रामदुलारी, सुमन सारगे, जिजाबाई याटेकरे, सुरेश बिराजदार, ओम बिराजदार, संदीप औरादे, ओमकार स्वामी, बस्वराज पाटील, श्रीमंत मोरे, संतोष नायब, रानबा कावले, दयानंद मठपती, प्रकाश सोळंके, संजू इरलापल्ले, दयानंद इरलापल्ले, नागनाथ चिलमे, मौलासाब पटेल, सय्यद पटेल, व्यंकट आनपटे, महेश चिलमे, वाहेद पटेल, दिनकर गायकवाड, विष्णू राजोळे, सरपंच नसरुद्दीन मुसा पटेल, उपसरपंच राजेंद्र गायकवाड आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Turn to horticulture under MGNREGA scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.