हळद वाढवणा, वडगावचे सरपंचपद उमेदवाराअभावी रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:18+5:302021-02-11T04:21:18+5:30

तालुक्यात सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरू आहे. मेवापूरच्या सरपंचपदी कोमल तुळशीदास पाटील, उपसरपंच म्हणून गौतम गायकवाड, मरसांगवीच्या सरपंचपदी पूजा ...

Turmeric grower, Sarpanch post of Wadgaon vacant due to lack of candidates | हळद वाढवणा, वडगावचे सरपंचपद उमेदवाराअभावी रिक्त

हळद वाढवणा, वडगावचे सरपंचपद उमेदवाराअभावी रिक्त

तालुक्यात सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरू आहे. मेवापूरच्या सरपंचपदी कोमल तुळशीदास पाटील, उपसरपंच म्हणून गौतम गायकवाड, मरसांगवीच्या सरपंचपदी पूजा रवी गोरखे, उपसरपंच शेख शादुल, शिवाजीनगर तांडा सरपंचपदी जयश्री तानाजी राठोड, उपसरपंच रमेश जाधव, बेळसांगवीच्या सरपंचपदी धर्मपाल देवशेट्टे, उपसरपंच मीनाबाई वामन वाघमारे, एकुरका खु.च्या सरपंचपदी पांडुरंग केंद्रे, उपसरपंच पार्वती सतीश जायभाये, तसेच विराळच्या सरपंचपदी सरोजा संतोष पवार, उपसरपंच किशन सोनटक्के यांची निवड झाली. ९ पैकी ६ गावांचा कारभार महिलांच्या हाती आला आहे. या निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

उपसरपंचपद रिक्त...

तालुक्यातील पाटोदा खु.च्या सरपंचपदी ललिता दत्ता गीते यांची निवड झाली, तर उपसरपंचपद रिक्त राहिले आहे. वडगाव येथील सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित हाेते; परंतु या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले आहे. उपसरपंचपदी वंदना गोविंद मुंडे यांची निवड झाली. हळद वाढवणाचे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते; परंतु या प्रवर्गातील महिला नसल्याने तेथीलही सरपंचपद रिक्त राहिले. उपसरपंचपदी सत्यवान पाटील यांची निवड झाली.

Web Title: Turmeric grower, Sarpanch post of Wadgaon vacant due to lack of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.