शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:31+5:302021-03-13T04:35:31+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या चेअरमनपदी आ. बाबासाहेब पाटील यांची निवड झाल्याने त्यांचा महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने सत्कार ...

शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या चेअरमनपदी आ. बाबासाहेब पाटील यांची निवड झाल्याने त्यांचा महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच विठ्ठलराव बोडके होते. यावेळी सरपंच किशोर मुंडे, निवृत्ती कांबळे , शिवाजीराव देशमुख, राजाभाऊ शिंदे, राम बोडके, जि.प. सदस्य माधव जाधव, दिलदार शेख, शादुल शेख, जितेंद्र बदने, प्रभाकर क्षीरसागर, धनराज बोडके आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, राज्यातील खत निर्मिती कारखान्यांना नवसंजीवनी देऊन अधिक खत निर्मिती केली जाईल. याप्रसंगी प्राचार्य डॉ. भारत भदाडे, प्रा. बळीराम पवार, प्रा. चेतन मुंढे, प्रा. विठ्ठल चव्हाण, प्रा. बळी कासलवार, संतोष पवार आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक विठ्ठलराव बोडके, प्रा. संजय जगताप यांनी केले. आभार प्रा. बालाजी आचार्य यांनी मानले.