गोदाम फोडून पळविलेल्या साहित्यासह ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:17 IST2021-03-22T04:17:54+5:302021-03-22T04:17:54+5:30

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जी. बी. कदम व पोलीस उपनिरीक्षक के. बी. नेहरकर यांच्या नेतृत्त्वाखाली दोन पथके ...

Truck confiscated with stolen goods | गोदाम फोडून पळविलेल्या साहित्यासह ट्रक जप्त

गोदाम फोडून पळविलेल्या साहित्यासह ट्रक जप्त

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जी. बी. कदम व पोलीस उपनिरीक्षक के. बी. नेहरकर यांच्या नेतृत्त्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेला ट्रक (जीजे ३१ टी ३७१०) असल्याचे निष्पन्न झाले. सदरील ट्रक गुजरातमधील गोध्रा येथील असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सदरील पथकाने गोध्रा गाठले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी मोहसीन जियाओद्दीन टपला (रा. उडण बाजार, ता. गोध्रा) यास ताब्यात घेतले. तसेच चोरीसाठी वापरलेला ट्रकही ताब्यात घेतला. सदरील आरोपीकडून १४ लाख १६ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे , एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. बी. कदम, के. बी. नेहरकर व पथकातील पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, राजाभाऊ मस्के, युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, नीलेश जाधव यांनी केली.

Web Title: Truck confiscated with stolen goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.