ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; दोन युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:49+5:302021-09-11T04:21:49+5:30

यादव गोविंद जवळगे (२९) व कुमार नवनाथ मुलगे (२६, दोघेही रा. लादा, ता. भालकी) असे अपघातात मयत झालेल्या युवकांची ...

Truck-bike horrific accident; Two youths killed on the spot | ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; दोन युवक जागीच ठार

ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; दोन युवक जागीच ठार

यादव गोविंद जवळगे (२९) व कुमार नवनाथ मुलगे (२६, दोघेही रा. लादा, ता. भालकी) असे अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, भालकी तालुक्यातील लादा येथील यादव जवळगे व कुमार मुलगे हे दोघे दुचाकी (केए ३८, यू १४०७) वरून काही कामानिमित्त भालकी येथे शुक्रवारी आले होते. येथील कामकाज आटोपून ते सायंकाळी गावाकडे निघाले होते. तेव्हा लातूरहून भालकीकडे भरधाव वेगात येणारा ट्रक (एमएच ३४, बीजी ८११९) आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली. यात दुचाकीवरील दोघेही हवेत उडून जमिनीवर आपटले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक नारंजा नदीनजीक उलटला.

हा अपघात झाल्यानंतर ट्रकचालक फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी देवराज, सर्कल इन्स्पेक्टर दोडमनी, हुलसूरचे प्रभारी पीएसआय चंद्रशेखर, सरदार, पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली.

दोघेही अविवाहित...

अपघातात मयत झालेले जवळगे व मुलगे हे दोघे अत्यंत जीवलग मित्र होते. दोघेही अविवाहित होते. त्यामुळे गावात शोक व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रभू चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सोबत दोघांचे पासपोर्ट फोटो...

१० एलएचपी यादव जवळगे

१० एलएचपी कुमार मुलगे

Web Title: Truck-bike horrific accident; Two youths killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.