शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

औस्यात मराठा आरक्षणासाठी सरकारला वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:32 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा व समाज बांधवाच्या वतीने औसा टी- पॉर्इंट येथे आज सकाळी दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले़

ठळक मुद्देआंदोलनामुळे लातूर- सोलापूर महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती़

औसा ( लातूर) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा व समाज बांधवाच्या वतीने औसा टी- पॉर्इंट येथे आज सकाळी दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या़.यासोबतच संतप्त आंदोलकांनी सरकार आणि मराठा समाजाच्या आमदारांना श्रद्धांजली वाहिली.

आज मराठा समाज बांधव दारिद्र्यात जीवन जगत असून हा समाज सर्व क्षेत्रात मागे पडला आहे़ समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षण मिळाले पाहिजे़ आरक्षणाचा न्याय जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरुच राहील़ परळीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हा रास्तारोको करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले़

औसा टी- पॉर्इंट येथे सकाळी ११ वा़ हे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनामुळे लातूर- सोलापूर महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती़ त्यामुळे दोन्ही बाजूंनी दोन- दोन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ या आंदोलनात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता़ आंदोलनानंतर नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ 

या आंदोलनात सुरेश भुरे, गोपाळ धानुरे, आकाश पाटील, नागेश मुगळे, भरत सूर्यवंशी, संजय कदम, विष्णू माडजे, राजेंद्र मोरे, धर्मराज पवार, संजय उजळंबे, विलास लंगर, अविनाश पवार, रामराम जंगाले, नितीन सांळुके, वैभव बोडके, भैरवनाथ माळी, चंद्रकांत माने, खंडू जाधव, पुरुषोत्तम नलगे, गोविंद खंडाळगे, सदानंद भोसले, शशिकांत माने, आत्माराम साळुंके, निलेश बोरफळे यांच्या अनेक समाज बांधव सहभागी झाले होते़

सरकारला वाहिली श्रध्दांजलीऔसा टी- पॉर्इंट येथील आंदोलनादरम्यान, सरकार व मराठा समाजाच्या  १४५ आमदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली़ परळीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला़ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या़ आमच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे़ समाजाचे आमदार मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षणagitationआंदोलन