११७९ जणांची चाचणी; २९ जणांना काेरनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:16+5:302021-06-30T04:14:16+5:30

मंगळवारी एकूण ३८४ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या असून, त्यामध्ये ९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. एकूण १ ...

Trial of 1179 persons; Carnegie obstruction to 29 people | ११७९ जणांची चाचणी; २९ जणांना काेरनाची बाधा

११७९ जणांची चाचणी; २९ जणांना काेरनाची बाधा

मंगळवारी एकूण ३८४ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या असून, त्यामध्ये ९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. एकूण १ हजार ११७ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये २० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मंगळवारी आरटीपीसीआर आणि रॅपिड अशा एकूण २९ जणांना काेराेनाची बाधा झाली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण ३८४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरटीपीसीआर चाचणीत ९ जणांचा, तर रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये २० असे एकूण २९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मंगळवारी उपचारादरम्यान दाेघांचा मृत्यू झाला. यामध्ये साठ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकाचा, तर इतर आजार असल्याने एकाचा मृत्यू झाला. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९७.१० टक्क्यांवर आहे. मंगळवारी काेराेनावर मात केलेल्या ३५ जणांचा प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना सुटी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एल. एस. देशमुख यांनी दिली.

Web Title: Trial of 1179 persons; Carnegie obstruction to 29 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.