वलांडीत लोकसहभागातून वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:12+5:302021-06-20T04:15:12+5:30

वृक्ष लागवड-संवर्धन समितीची सरपंच भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. देणगीदारांच्या नावे गावातील सार्वजनिक जागेवर झाडे लावण्यात येणार आहेत. ...

Tree planting through public participation in Valandi | वलांडीत लोकसहभागातून वृक्षलागवड

वलांडीत लोकसहभागातून वृक्षलागवड

वृक्ष लागवड-संवर्धन समितीची सरपंच भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. देणगीदारांच्या नावे गावातील सार्वजनिक जागेवर झाडे लावण्यात येणार आहेत. कोणीही लोकवाटा दिला तर त्याच्या नावे सौजन्य, झाड ट्री गार्डसह लावण्याची योजना आहे. यामध्ये रोख रक्कम, श्रमदान, वृक्षदान, काळी माती ट्री गार्ड इ. स्वरूपात लोकांना मदत करता येणार आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर येथील ग्रीन लातूर वृक्षचे सोनू डगवाले यांच्या वतीने १०० रोपटे, तर वलांडी येथील सहशिक्षिका सुरेखा विलास गरड यांच्या वतीने ५२ रोपे देण्यात आली. यावेळी पोलीस चौकीच्या आवारात, उस्मानिया मस्जिद परिसरात व येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय साळुंके, माजी सरपंच राम भंडारे, सरपंच राणीताई भंडारे, उपसरपंच महमूद सौदागर, सोनू डगवाले, पंचायत समितीचे माजी सभापती संजय रेड्डी, माजी सरपंच पुंडलिक बिरादार, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, बालाजी वळसंगीकर, शार्दूल बौडीवाले, रवी स्वामी, शिवाजी जगताप, मुस्ताक कादरी, रवी गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Web Title: Tree planting through public participation in Valandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.