शिवजयंतीनिमित्त आशिव येथे वृक्षाराेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:08+5:302021-03-04T04:35:08+5:30
भुतमुगळी- लिंबाळा पाणंद रस्त्यावर अतिक्रमण लातूर : निलंगा तालुक्यातील भुतमुगळी ते लिंबाळा या पाणंत रस्त्यावर १४ शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले ...

शिवजयंतीनिमित्त आशिव येथे वृक्षाराेपण
भुतमुगळी- लिंबाळा पाणंद रस्त्यावर अतिक्रमण
लातूर : निलंगा तालुक्यातील भुतमुगळी ते लिंबाळा या पाणंत रस्त्यावर १४ शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, रस्ता संपुष्टात आला आहे. रस्त्यालगत शेतकऱ्यांना आता रस्त्याअभावी उसताेडणीही करता येत नाही. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी त्रस्त शेतकऱ्यांनी निलंगा येथील तहसील कार्यालयासह पाेलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. सध्या केवळ रस्त्याच्या अभावी त्रस्त शेतकऱ्याचा उस ताेडता येत नाही. त्यामुळे शेतातच उभा उस वाळत आहे. अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्याने रस्त्यावर दगड टाकली आहेत. विशेष म्हणजे, घर बांधकामही केले आहे. भुतमुगळी ते लिंबाळा जाणारा पाणंदरस्ता नकाशावर आहे. मात्र, या रस्त्यावर गेल्या काही वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले आहे. ते हटविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून हाेत आहे.