चेरा ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:16+5:302021-07-30T04:21:16+5:30

... चाकुरातील कोरोनामुक्त तिघांची केली सुटी चाकूर : तालुक्यातील मागील १५ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. शेवटच्या ...

Tree planting activities by Chera Gram Panchayat | चेरा ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण उपक्रम

चेरा ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण उपक्रम

...

चाकुरातील कोरोनामुक्त तिघांची केली सुटी

चाकूर : तालुक्यातील मागील १५ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. शेवटच्या तीन रुग्णांना उपचारानंतर बुधवारी कोरोना केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. प्रभोदय मुळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन राठोड, श्रीनिवास हसनाळे, नम्रता पंचाक्षरी यांची उपस्थिती होती. चाकूर तालुका कोरोनामुक्त झाला असला तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे.

...

पूरग्रस्तांसाठी औसा येथे काँग्रेसची मदत फेरी

औसा : काँग्रेस, युवक काँग्रेस व विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुधवारी शहरातून फेरी काढण्यात आली. यात ५१ हजार रुपये संकलित झाले.

प्रा. सुधीर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत संकलित करण्यात आली. त्यासाठी तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, युवक काँग्रेसचे हनुमंतराव राचट्टे, खुंदरमिर मुल्ला, रवी पाटील, शहनवाज पटेल, नगरसेवक जयराज कसबे, अंगद कांबळे, भागवत माळी, बरजंग बाजुळगे, संजय लाेंढे, पुरुषाेत्तम नलगे, सदाशिव माळी, ख्वाजा शेख, ओमप्रकाश गरड आदींनी पुढाकार घेतला होता.

...

Web Title: Tree planting activities by Chera Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.