वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धन ही लोकचळवळ होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:06+5:302021-07-12T04:14:06+5:30
तालुक्यातील हिप्परगा येथे वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दीपक चव्हाण होते. यावेळी उपसरपंच गणेश कानुरे, ग्रामसेवक गायकवाड, ...

वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धन ही लोकचळवळ होणे गरजेचे
तालुक्यातील हिप्परगा येथे वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दीपक चव्हाण होते. यावेळी उपसरपंच गणेश कानुरे, ग्रामसेवक गायकवाड, मुख्याध्यापक मनोज मुंढे, पाटील, केंद्रप्रमुख एस.पी. मुंढे, माजी सरपंच ज्ञानोबा मुंढे, मारोती मुंढे, सतीश चव्हाण, हणमंत कानुरे, केंद्रे, मधुकर बिरादार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एस.पी. मुंढे, सूत्रसंचालन ज्ञानोबा मुंढे यांनी केले. आभार मनोजकुमार मुंढे यांनी मानले.
आरोग्य जागृती महत्त्वाची...
जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे म्हणाले, आज ग्रामीण भागात पर्यावरण व आरोग्य जागृती महत्त्वाची आहे. बाला उपक्रमाअंतर्गत शाळांचा भौतिक व गुणात्मक विकास करण्यासाठी दिलेला लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषदेच्या ५१ हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पनेस ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून हिप्परगा येथे ५०० रोपांची लागवड करण्यात आली.