कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच उपचार घ्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:29+5:302021-06-04T04:16:29+5:30
मराठी विज्ञान परिषद, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित कोविड-१९ महामारी जनजागरण अभियान आयुर्वेद सप्ताहअंतर्गत ...

कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच उपचार घ्यावेत
मराठी विज्ञान परिषद, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित कोविड-१९ महामारी जनजागरण अभियान आयुर्वेद सप्ताहअंतर्गत ‘आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बी. जी. ए. महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. मांगिरीश रांगणेकर होते. यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन मुंबईचे सदस्य डॉ. विष्णू बावणे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, आयुर्वेदाचा समृद्ध वारसा भारताला लाभलेला आहे. ऋषिमुनींनीही आयुर्वेदाचे ज्ञान सर्वांसाठी खुले केले आहे. दररोज वाफ घेतल्यास जंतूंना अटकाव होऊ शकतो. ठरावीक काळाने चुळा भरणे व गुळण्या करणे याचाही उपयोग होतो. आयुर्वेद आणि योग ही दोन भावंडे आहेत. कपालभाती, पर्वतासन, वृक्षासन, ताडासन अशा प्रकारची आसने करूनही फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविता येते. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. दिनचर्येत आवश्यक ते बदल करीत समतोल आहार घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल अलापुरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी करून दिला. आभार प्रा. प्रवीण जाहुरे यांनी मानले.