पाेलीस निरीक्षक सुनील नागरगाेजे, हिबारे, चाेरमले, उबाळे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:44+5:302021-08-21T04:24:44+5:30
लातूर जिल्हा पाेलीस दलात कार्यरत आणि जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण करणारे पाेलीस निरीक्षक सुनील नागरगाेजे यांची बदली परभणी येथे करण्यात ...

पाेलीस निरीक्षक सुनील नागरगाेजे, हिबारे, चाेरमले, उबाळे यांची बदली
लातूर जिल्हा पाेलीस दलात कार्यरत आणि जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण करणारे पाेलीस निरीक्षक सुनील नागरगाेजे यांची बदली परभणी येथे करण्यात आली आहे. नानासाहेब उबाळे, अनिल चाेरमले यांची नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली आहे. तर लातूर शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक संजय हिबारे यांची विनंतीवरून नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. तर परभणी जिल्ह्यातून दीपक शिंदे, रामेश्वर तट आणि हिंगाेली जिल्ह्यात कार्यरत असलेले अंगद सुडके, नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले बालाजी माेहिते हे पाेलीस निरीक्षक यांची लातूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील सहायक पाेलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय पवार, अनिल कुरुंदकर, गफार शेख यांची नांदेड जिल्ह्यात तर पाेलीस उपनिरीक्षक अमाेल गुंडे, विजय पाटील, नागाेराव जाधव, प्रदीप गाैंड, गणेश कदम, गजानन अन्सापुरे, दिनेश शिंगणकर यांची लातूर जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तर नांदेड जिल्ह्यातून सुरेश नरवाडे, राजाभाऊ जाधव यांची लातूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पाेलीस उपमहानिरीक्षक निसार तांबाेळी यांनी गुरुवारी जारी केले आहेत.