शहरातील मुख्य चौकात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST2021-03-08T04:20:09+5:302021-03-08T04:20:09+5:30
उन्हामुळे शीतपेयांची दुकाने थाटली लातूर : मार्च महिना सुरू झाल्यानंतर शहरातील तापमानात काहीअंशी वाढ झाली आहे. परिणामी, उन्हाची तीव्रता ...

शहरातील मुख्य चौकात वाहतूक कोंडी
उन्हामुळे शीतपेयांची दुकाने थाटली
लातूर : मार्च महिना सुरू झाल्यानंतर शहरातील तापमानात काहीअंशी वाढ झाली आहे. परिणामी, उन्हाची तीव्रता वाढत असून, शहरात विविध ठिकाणी शीतपेयांची दुकाने थाटण्यात आली आहेत. विविध फळांचा रस, लिंबू सरबत, ऊसाचा रस आदी शीतपेयांसाठी शहरात दुकाने थाटली आहेत. ग्राहकही उन्हापासून बचावासाठी या शीतपेयांचा आधार घेत आहेत.
जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा
लातूर : शहरातील एमआयडीसी येथील जिजामाता विद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सलिमा सय्यद, राजकुमार शिंदे, देविदास कोल्हे, प्रा. बाबासाहेब सोनवणे, प्रा. दत्तात्रय मुंडे, बाळासाहेब बावणे, शंकर पांचाळ, भाग्यशाली गुडे, वैशाली वाघमारे, बालाजी साबळे, गोकुळ मदकंटे, आप्पासाहेब देशमुख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
पानझडतीने वाॅकिंग ट्रॅकवर झाला कचरा
लातूर : क्रीडा संकुलातील वाॅकिंग ट्रॅकवर पानझडतीमुळे अनेक ठिकाणी कचरा जमा झाला आहे. सकाळी व सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात याठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. मात्र, जागोजागी कचरा साचल्याने अस्वच्छता पसरली आहे. क्रीडा संकुलातील वाॅकिंग ट्रॅकची नियमितपणे झाडलोट करून स्वच्छता व्हावी, अशी मागणी खेळाडूंसह नागरिकांतून होत आहे.
महाराष्ट्र क्लबच्या चार खेळाडूंची निवड
लातूर : कर्नाटक येथील लच्छन येथे ६ व ७ मार्च दरम्यान झालेल्या लच्छन प्रीमियर लीग व्हाॅलिबाॅल स्पर्धेत लातूरच्या महाराष्ट्र व्हाॅलिबाॅल क्लबच्या चार खेळाडूंची लीग स्पर्धेच्या विविध संघात निवड झाली आहे. यात प्रल्हाद सोमवंशी, विशाल वगरे, आदित्य माने व विठ्ठल कवरे यांचा समावेश आहे. त्यांच्या या निवडीचे स्वागत प्रशिक्षक दिनेश खानापुरे, विजय सोनवणे, रामदास नाडे, माधव रासुरे, व्यंकुराम गायकवाड, गणेश हाके, हरिश बुड्डे, नंदू भोसले, महेश तोंडारे, नानासाहेब देशमुख, पंकज पाळणे, प्रमोद गडेकर, रितेश अवस्थी यांनी केले.