वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:47+5:302020-12-06T04:20:47+5:30
.... ऊस दराकडे लक्ष निलंगा : साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. मात्र, महिना उलटला तरी अद्यापही कारखान्यांनी ...

वाहतुकीची कोंडी
....
ऊस दराकडे लक्ष
निलंगा : साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. मात्र, महिना उलटला तरी अद्यापही कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. त्यामुळे शेतक-यांचा लक्ष लागले आहे. दर जाहीर करण्याची मागणी होत आहे.
...
मातीच्या भांडींना मागणी
लातूर : शहरातील औसा रोडवर तसेच लातूर- औसा रस्त्यावर मातीच्या भांडी विक्रीची दुकाने थाटली आहे. सध्या ग्राहकांतून या भांडींना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. परराज्यातील विक्रेते या भागात दाखल झाले आहेत.
...
वीजग्राहकांत संताप
चापोली : महावितरणच्या वतीने देण्यात येणारी बिले ही वीज वापरापेक्षा अधिक प्रमाणात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुरुस्तीसाठी सातत्याने मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
...
वाहने भरधाव
लातूर : शहरातील रेणापूर नाका ते ५ नंबर चौक असा नवीन रिंगरोड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे भरधाव वेगात वाहने धावत आहेत. गतिरोधक नसल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी आहे.