इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अहमदपुरात ट्रॅक्टर रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:42+5:302021-02-06T04:34:42+5:30
या रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आ. बाबासाहेब पाटील यांनी केले. शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयापासून निघालेली ही ट्रॅक्टर रॅली ...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अहमदपुरात ट्रॅक्टर रॅली
या रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आ. बाबासाहेब पाटील यांनी केले. शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयापासून निघालेली ही ट्रॅक्टर रॅली महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचली. त्यानंतर सभा झाली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, जि.प. सदस्य माधव जाधव, मंचकराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. हेमंत पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, शिवसेनेचे बालाजी रेड्डी, तालुकाध्यक्ष विलास पवार, चंद्रकांत मद्दे, तालुका किसान सेलचे विनायक पाटील, शिवाजी खांडेकर, राजू पाटील, तुकाराम पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास महाजन, राष्ट्रवादीचे प्रशांत भोसले, अजहर बागवान, सिराजोद्दीन जागीरदार, उत्तम माने, मोहन पाटील, बाळासाहेब पाटील आंबेगावकर, भारत सांगवीकर, धनराज गिरी, व्यंकट वंगे, गोपीनाथ जोंधळे, अनिल बेंबडे, बाळासाहेब बेडदे, अविनाश मंदाडे, सुशील घोटे, नगरसेवक फुजैल जागीरदार, अभय मिरकले,भैय्या सरवरलाल, मुन्ना सय्यद, जावेद बागवान, फिरोज शेख, संदीप चौधरी, अफरोज शेख, शेखर चौधरी, सचिन पडिले, इलियास सय्यद, गणेश जाधव, बालाजी तिडोळे, हनुमंत पेड, मोहन पाटील, पिराजी कसबे, अनिल लामतुरे, शैलेश जाधव आदी उपस्थित होते.
दीडशे ट्रॅक्टरची रॅली...
शहरात पहिल्यांदाच ट्रॅक्टर रॅली निघाली. त्यात दीडशेच्यावर ट्रॅक्टर होते. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले होते. पहिले ट्रॅक्टर स्वतः आ. बाबासाहेब पाटील यांनी चालविले.
केंद्र सरकारच्या धोरणावर टीका...
आ. बाबासाहेब पाटील यांनी केंद्र शासनाच्या शेतकरी धोरणावर टीका केली. या कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संपणार आहेत. शेतमजुरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. केंद्र शासनाने त्वरित कायदे मागे घ्यावेत. तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढल्या असून सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ बसणार आहे. केंद्र सरकार पूर्णतः सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.