ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास चिरडले; दोन तरुण ठार
By Admin | Updated: April 12, 2017 14:39 IST2017-04-12T14:39:06+5:302017-04-12T14:39:06+5:30
औसा-नागरसोगा रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा ट्रॅक्टरने एका दुचाकीला चिरडल्याची घटना घडली.

ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास चिरडले; दोन तरुण ठार
ऑनलाइन लोकमत
औसा, दि. 12 - तालुक्यातील औसा-नागरसोगा रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा ट्रॅक्टरने एका दुचाकीला चिरडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. तर ट्रॅक्टरचालक घटनेनंतर फरार झाला असून, या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औसा तालुक्यातील दापेगाव येथील बंडू जगन्नाथ डुकरे (२५), किसन रमाकांत डुकरे (२३) हे दुचाकीवरून (एमएच २४ एएन ५६८०) जात असताना भरधाव ट्रॅक्टरने (एमएच २४ डी २६२०) चिरडले. हा अपघात मंगळवारी रात्री ११.०० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. यात दोन्ही तरुण जागीच ठार झालीे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला असून, त्याच्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औसा पोलिसांनी घटनास्थळास मध्यरात्री भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले.
ट्रॅक्टरचालक फरार : घटनास्थळी पोलिसांची भेट
औसा-नागरसोगा रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात दापेगावचे दोन तरुण जागीच ठार झाले. तर घटनेनंतर ट्रॅक्टरचालक फारार झाला आहे. औसा पोलीस त्याचा शोध घेत असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.