पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:26+5:302021-03-21T04:18:26+5:30
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील तीर्थ धानाेरा येथील एका सहा वर्षीय मुलीला ७ मार्च राेजी सकाळी ११ वाजता पैशाचे ...

पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील तीर्थ धानाेरा येथील एका सहा वर्षीय मुलीला ७ मार्च राेजी सकाळी ११ वाजता पैशाचे आमिष दाखवून घरी बाेलवून घेतले, शिवाय अत्याचार केला. याबाबत कुणाला काही माहिती सांगितल्यावर जीवे मारण्याची धमकीही दिली. मुलीला त्रास हाेत असल्याने आजीने अहमदपूर येथील रुग्णालयात ९ मार्च राेजी उपचारासाठी दाखल केले. डाॅक्टरांनी वैद्यकीय तपासणी न करताच उपचार केले, मात्र त्रास काही कमी झाला नाही. याबाबतची माहिती मंगळवेढा येथे ऊसताेड कामगार असलेल्या भावाला सांगण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता अत्याचार झाल्याचे समाेर आले. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी बलराज लंजिले यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण सदर आराेपीला लागल्याने ताे हैदराबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत हाेता. दरम्यान, उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे बसमधून त्याच्या पाेलिसांनी मुसक्या आवळत अटक केली.