जि.प.च्या ३७४ शाळांतील स्वच्छतागृहे मोडकळीस, विद्यार्थी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:26+5:302021-02-15T04:18:26+5:30

दरम्यान, ग्रामीण भागातील पालकांसाठी जिल्हा परिषद शाळा महत्त्वाची आहे. आर्थिकदृष्ट्या मागासच नव्हे तर मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलेही तिथे शिक्षण घेत ...

Toilets in 374 schools of ZP are in disrepair, students are open | जि.प.च्या ३७४ शाळांतील स्वच्छतागृहे मोडकळीस, विद्यार्थी उघड्यावर

जि.प.च्या ३७४ शाळांतील स्वच्छतागृहे मोडकळीस, विद्यार्थी उघड्यावर

दरम्यान, ग्रामीण भागातील पालकांसाठी जिल्हा परिषद शाळा महत्त्वाची आहे. आर्थिकदृष्ट्या मागासच नव्हे तर मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलेही तिथे शिक्षण घेत आहेत. मात्र, काही ठिकाणी आजही भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १२७८ शाळा आहेत. त्यात १२२९ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहे, तर ४९ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते १० वीपर्यंतचे वर्ग आहेत. दरम्यान, या शाळांपैकी १९२ शाळांतील मुलांसाठीचे स्वच्छतागृह मोडकळीस आले आहेत. तसेच १८२ शाळांमधील मुलींसाठीच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना उघड्यावर लघुशंका, शौचास जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.

अहमदपूर तालुक्यातील २०, उदगीर- १७, औसा- २७, चाकूर- १०, जळकोट- १९, देवणी- ४५, निलंगा- १४८, रेणापूर- ३७, लातूर- २० आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ३१ शाळांतील स्वच्छतागृह मोडकळीस आले आहेत.

१२७८ जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा

३७४ मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे

२७ शाळांमध्ये स्वच्छतागृहच नाही

८ कोटी दुरुस्तीसाठी आवश्यक निधी

तालुका मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे

अहमदपूर २०

उदगीर १७

औसा २७

चाकूर १०

जळकोट १९

देवणी ४५

निलंगा १४८

रेणापूर ३७

लातूर २०

शिरूर अनंतपाळ ३१

दुरुस्तीसाठी नियोजन...

जिल्ह्यातील काही शाळांतील स्वच्छतागृहे मोडकळीस आली आहेत. त्यांची दुरुस्ती १५ व्या वित्त आयोगातून करण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच विशेष बाब म्हणून शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच दुरुस्ती करण्यात येईल.

- राहुल केंद्रे, अध्यक्ष, जिल्हा परिषद.

२७ शाळांमध्ये स्वच्छतागृहच नाही...

जिल्ह्यातील २७ शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत. त्यात मुलांच्या २० तर मुलींच्या ७ शाळांचा समावेश आहे. तसेच दोन शाळांतील स्वच्छतागृहांसाठी जागा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. शासन व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर स्वच्छतागृहांची डागडुजी करावी तसेच नवीन स्वच्छतागृहांची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Toilets in 374 schools of ZP are in disrepair, students are open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.