५० पेक्षा जास्त वय असलेल्या हाेमगार्ड्सवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:43+5:302021-06-09T04:24:43+5:30
लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ५० पेक्षा अधिक वय असलेल्या हाेमगार्ड्सची सेवा सध्याला थांबविण्यात आली आहे. फिटनेसच्या कारणावरून सदरची ...

५० पेक्षा जास्त वय असलेल्या हाेमगार्ड्सवर उपासमारीची वेळ
लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ५० पेक्षा अधिक वय असलेल्या हाेमगार्ड्सची सेवा सध्याला थांबविण्यात आली आहे. फिटनेसच्या कारणावरून सदरची सेवा थांबविण्यात आल्याची माहिती समाेर आली आहे. परिणामी, लातूर जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या हाेमगार्ड्सवर काेराेना महामारीच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत ४८९ हाेमगार्ड्स कर्तव्यावर आहेत.
लातूर जिल्ह्यात नाेंदणी केलेल्या हाेमगार्ड्सची संख्या एकूण १ हजार २० आहे. यामध्ये १०५ महिला तर ९१५ पुरुषांचा समावेश आहे. राज्याच्या महानिदेशकांनी ५० पेक्षा अधिक वय असणाऱ्या हाेमगार्ड्सची फिटनेसच्या कारणावरून सेवा थांबविली आहे. राेजंदारी पद्धतीने दिवसाला ६२० रुपये मानधनावर कार्य करणाऱ्या हाेमगार्ड्सचा हक्काचा राेजगार काेराेनाच्या काळात हिरावला गेला आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण १ हजार २० हाेमगार्ड्सपैकी ११३ जण ५० पेक्षा अधिक वय असलेले आहे. यामध्ये २० महिला तर ९३ पुरुष हाेमगार्ड्सचा समावेश आहे. राेजगारच थांबल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
महानिदेशकांच्या आदेशानुसार थांबविली सेवा
राज्याच्या महानिदेशकांच्या आदेशानुसार ५० पेक्षा अधिक वय असलेल्या हाेमगार्ड्सची सेवा सध्याला थांबविण्यात आली आहे. फिटनेस आणि काेराेना संसर्ग हाेणार नाही, या प्रमुख कारणासाठी सदरची सेवा थांबविण्यात आली आहे. मात्र, ज्यांचे वय ५० च्या आत आहे, अशांना कर्तव्यावर बाेलाविण्यात आले आहे. त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणासाठी सर्वच हाेमगार्डची ऑनलाइन नाेंदणी करण्यात आली आहे. सध्याला ९०७ पैकी ४८९ जण कर्तव्यावर आहेत.
-हिंमत जाधव, अप्पर पाेलीस अधीक्षक, लातूर