किनगावात तीन दुकानांना आग, सव्वाकोटीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:57+5:302021-05-06T04:20:57+5:30
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील मुख्य रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोरील बाजूच्या पत्राच्या शेडमध्ये फर्निचर दुकान, जनरल, मशिनरी स्टोअर्सचे दुकान ...

किनगावात तीन दुकानांना आग, सव्वाकोटीचे नुकसान
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील मुख्य रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोरील बाजूच्या पत्राच्या शेडमध्ये फर्निचर दुकान, जनरल, मशिनरी स्टोअर्सचे दुकान आहे. या दुकानांना मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आणि ती भडकली. दरम्यान, अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत तीन दुकाने भस्मसात झाली, तसेच या आगीत बाजूच्या एका कापड दुकानाचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
घटनास्थळास आमदार बाबासाहेब पाटील, सरपंच किशोर मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. बुधवारी सकाळी मंडळ अधिकारी सोपान दहिफळे, तलाठी हंसराज जाधव यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
या आगीत नसीर शुकूरसाब मोमीन यांच्या सिमरन फर्निचर इंटरप्रायजेस ॲण्ड मोबाइल शॉपीतील २८ लाखांचे, हाफीज शुकूरसाब मोमीन यांच्या अब्दुल शुकूर मशिनरी स्टोअर्सचे ६८ लाखांचे, तर गियासोद्दीन शुकूरसाब मोमीन यांच्या न्यू अब्दुल शुकूर जनरल स्टोअर्सचे २० लाखांचे नुकसान झाले, तसेच शेख शफिक बशीरसाब यांच्या न्यू बालाजी क्लॉथ सेंटरचे १० लाखांचे नुकसान झाल्याचे तहसीलदारांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे.