शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

बारा दुचाकींसह नांदेडातील तिघांच्या मुसक्या आवळल्या, लातूर पाेलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 19:58 IST

लातूरसह नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त...

लातूर : जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकींची चाेरी करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील तिघांच्या  माेठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या असून, बारा दुचाकींसह ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.  लातूरसह जिल्ह्यातील दुचाकी चाेरीप्रकरणी टाेळीतील चाेरट्यांचा शाेध घेतला जात असताना, लातुरातील विवेकानंद चाैक ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना बखऱ्याने माहिती दिली. विवेकानंद चौक ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत हा आरोपी बाभळगाव चौक परिसरात फिरत आहे. या माहितीची खातरजमा करुन घेतल्यानंतर पाेलिस पथकाने बाभळगाव परिसरात रोडवर थांबलेल्या व्यक्तींना झडप टाकून ताब्यात घेतले.

अधिक चाैकशी केली असता, त्यांनी नागेश हनुमंत मोरे (वय २६), जीवन गणपती सोनटक्के (वय २७) श्रीवर्धन आनंद सोनकांबळे (वय २०, तिघेही रा. पानशेवाडी, ता. कंधार जि. नांदेड) अशी नावे सांगितली. त्यांच्याकडे गन्ह्यांबाबत कसून चाैकशी केली असता, काही दिवसापूर्वी लातुरातील विश्वसागर सिटी, कातपूररोड येथून दाेन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून टप्प्या-टप्प्याने एकूण बारा दुचाकी जप्त केल्या आहेत. 

ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, अशोक घारगे, पोउपनि. अनिल कांबळे, गणेशकुमार यादव, संजय बेरळीकर, गणेश यादव, सारंग लाव्हरे, विनोद चालवाड, रमेश नामदास, आनंद हल्लाळे, संतोष कलबोणे, अनिता सातपूते, अजहर शेख, शिवकुमार पाटील, ईश्वर जाधव यांच्या पथकाने केली.

लातूरसह नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ...

लातूर पाेलिसांच्या अटकेत असलेल्या दुचाकी चाेरणाऱ्या टाेळीतील तिघांनी लातूरसह नांदेड जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ घातल्याचे समाेर आले आहे. त्यांनी लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यातून दुचाकींची चाेरी केल्याचे समाेर आले आहे. याबाबत त्या-त्या जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.