तीन तासांत वेदिकाने सायकलवरून पार केले ५० किमी अंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:43+5:302021-04-03T04:16:43+5:30
या स्पर्धेत १३१ जणांनी नाेंदणी केली होती. त्यात १० वर्षीय वेदिका खाेबरे हिने यश संपादन केले आहे. त्यामुळे तिची ...

तीन तासांत वेदिकाने सायकलवरून पार केले ५० किमी अंतर
या स्पर्धेत १३१ जणांनी नाेंदणी केली होती. त्यात १० वर्षीय वेदिका खाेबरे हिने यश संपादन केले आहे. त्यामुळे तिची क्लबला सायकल पार्टनर म्हणून निवड करण्यात आली आहे. वेदिका हिने क्रीडा संकुल ते पीव्हीआर चौक, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रेणापूर येथील रेणुकामाता दर्शन घेऊन पुन्हा लातूरला पोहोचली. ३ तास १ मिनिटांत ५० किमी सायकलिंग करून यश संपादन केले आहे.
वेदिका खोबरे म्हणाली, सुरुवातीस गल्लीतच सायकलिंग करीत असे. त्यानंतर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सराव सुरू केला. सुरुवातीस १० किमी स्पर्धेत सहभागी होत असे. त्यानंतर २५ किमी व ३५ किमीच्या सायकलिंगमध्ये सहभागी होऊ लागले. रविवारी घेण्यात आलेल्या स्पर्धेत ५० किमी अंतर सहज पार केले.
प्रतिकारशक्ती वाढते...
आपल्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सायकलिंग हा चांगला पर्याय आहे. कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत सायकलिंगमध्ये एकमेकांच्या संपर्कात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपोआप फिजिकल डिस्टन्स राखले जाते. सहजरीत्या व्यायाम होतो, असे वेदिका खोबरे हिने सांगितले.