गावठी पिस्टलप्रकरणी दाेघांना तीन दिवसांची पाेलीस काेठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST2021-09-26T04:22:08+5:302021-09-26T04:22:08+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील जुना रेणापूरनाका ते सुभेदार रामजीनगर परिसरात गावठी पिस्टल बाळगणारे दाेघे जण कारने येत असल्याची माहिती ...

गावठी पिस्टलप्रकरणी दाेघांना तीन दिवसांची पाेलीस काेठडी
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील जुना रेणापूरनाका ते सुभेदार रामजीनगर परिसरात गावठी पिस्टल बाळगणारे दाेघे जण कारने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळ लावला. जुना रेणापूर नाक्याकडून एक कार येत असल्याचे पाेलिसांना आढळून आले. या कारला हात दाखवून त्यांनी थांबविले. यावेळी कारची झाडाझडती घेतली असता, एक विनापरवाना गावठी पिस्टल, लायटर, चार जिवंत काडतुसे हाती लागली. यावेळी पाेलीस पथकाने कारसह इतर साहित्य असा १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सद्दाम बडेसाब शेख २० आणि माेहम्मद खलील माेहम्मद हुसेन शेख २८ यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अधिक चाैकशी केली असता, घरफाेडीसह चाेरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना एमआयडीसी पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी दुपारी लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, दाेघांनाही तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.