दुकानातून साडेतीन लाखांची राेकड पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST2021-02-14T04:19:06+5:302021-02-14T04:19:06+5:30
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर येथील पवन रामनिवास पुरोहित रा. व्यंकटेश नगर यांचे शिरूर ताजबंद येथे पुरोहित पेट्रोल पंप असून त्याठिकाणी ...

दुकानातून साडेतीन लाखांची राेकड पळवली
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर येथील पवन रामनिवास पुरोहित रा. व्यंकटेश नगर यांचे शिरूर ताजबंद येथे पुरोहित पेट्रोल पंप असून त्याठिकाणी गुरुवारी जमा झालेली रक्कम ३ लाख ३६ हजार रुपये शुक्रवारी बँकेत भरण्यासाठी त्यांनी आपल्या भांडी दुकानात ठेवली हाेती. दरम्यान, दुकानमालक शटर काढण्यासाठी बाजूला गेले असता, अज्ञात इसमाने त्यांच्या काउंटर मधील पांढऱ्या रंगाच्या पिशवीतील ३ लाख ३६ हजार रुपयांची राेकड पळविली. याबाबत संशियिताच्या हालचाल सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डंख, आर.एस. राजगिरवाड करत आहेत.
दुकानदारकडून संशयिताचा पाठलाग...
सदर रक्कम गेल्याची समजताच दुकानदार पवन पुरोहित यांनी पिशवीच्या रंगावरून व्यापाऱ्याच्या मदतीने मोटरसायकलवरुन पाठलाग केला. मात्र त्यांना पकडण्यात यश आले नाही. शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारासा दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे व्यापारात घबराट पसरली आहे.