महापुरुषांचे विचार साहित्यातून समाजासमोर यावेत : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:23+5:302021-08-28T04:24:23+5:30

वीरशैव समाजाच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वचन सप्ताह समारोप व पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

Thoughts of great men should come before the society through literature: Patil | महापुरुषांचे विचार साहित्यातून समाजासमोर यावेत : पाटील

महापुरुषांचे विचार साहित्यातून समाजासमोर यावेत : पाटील

वीरशैव समाजाच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वचन सप्ताह समारोप व पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे होते. यावेळी भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील-देवणीकर, समाजाचे सचिव ॲड. श्रीकांत बडीहवेली, डॉ. प्रकाश बिरादार कलबुर्गी, डॉ. प्रभुशंक भातांब्रे, शांतीकुमार उदगीरकर, अंतेश्वर शेटकार, शंकरअप्पा हरकरे, रमेश बिरादार, रामशेटी माळगे, रोटरी क्बलचे अध्यक्ष प्रमोद शेटकार, प्राचार्या डॉ. सुनीता चवळे, आदी उपस्थित होते.

श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील प्रा. डॉ. म. ई. तंगावार लिखित ‘धर्मवीर संग्रामप्पा : जीवन व कार्य’ या पुस्तकाचे व डॉ. मनोहर भंडारे लिखित ‘प्रभुराव कंबळीबाबा : व्यक्ती आणि कार्य’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गुरुप्रसाद पांढरे यांनी सूत्रसंचालन केले. पांचाळ यांनी आभार मानले.

Web Title: Thoughts of great men should come before the society through literature: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.