चोरट्यास मुद्देमालासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:04+5:302021-09-09T04:25:04+5:30

डोंगरशेळकी येथील रावसाहेब मुंडे व वैजनाथ पारीत यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ...

Thief arrested with issue | चोरट्यास मुद्देमालासह अटक

चोरट्यास मुद्देमालासह अटक

डोंगरशेळकी येथील रावसाहेब मुंडे व वैजनाथ पारीत यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५० हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी भरदिवसा घडली होती. चोरीनंतर चोरट्यांनी पळून जाताना त्यांची दुचाकी गावाबाहेर टाकली होती. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेमुळे गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. वाढवणा बु. ठाण्याचे पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी गुन्हा दाखल झाल्याबरोबर तपासाची चक्रे वेगाने फिरविली. २४ तासात या प्रकरणातील आरोपी संदीप त्र्यंबक पुंडे (२२, रा. जांब, ता. मुखेड) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्यापैकी १ लाख ९१ हजारांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत वाढवणा ठाण्याचे पोलीस कर्मचारी साळुंखे, कसबे यांनी त्यांना मदत केली.

Web Title: Thief arrested with issue