शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना चाचणीच्या ६० लॅब होणार- वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 05:40 IST

४ वरून ४० लॅब कार्यान्वित केल्या. ज्यामुळे राज्यात सर्वाधिक १ लाखापेक्षा अधिक चाचण्या झाल्या.

लातूर : राज्यात सध्या खासगी व शासकीय अशा एकूण ४० लॅबमध्ये कोरोना चाचणी केली जाते. लवकरच त्यात वाढ करून ६० लॅब कार्यान्वित होतील. दरम्यान, सद्य:स्थितीत दररोज ७ हजार चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी येथे दिली.राज्यात ४ लॅब होत्या. कोविड-१९ च्या संकटाची चाहूल लागताच राज्य सरकारने तातडीने पावले उचलत वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्या रुग्णालयांत तत्परतेने काम सुरू केले. ४ वरून ४० लॅब कार्यान्वित केल्या. ज्यामुळे राज्यात सर्वाधिक १ लाखापेक्षा अधिक चाचण्या झाल्या.राज्य सरकारने चाचण्या वाढविल्या, परंतु अधिक प्रमाणात टेस्टिंग किटची गरज असून त्याची उपलब्धता केंद्र सरकारकडून झाली पाहिजे. सद्य:स्थितीत पीपीई कीट व मास्कची संख्या पुरेशा प्रमाणात आहेत. रुग्णसंख्या दडवत असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व शासकीय यंत्रणा २४ तास कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.राज्यातील सरकारी रुग्णालयांबरोबरच महापालिकांच्या रुग्णालयांमध्येही कोविड-१९ च्या चाचण्या, उपचार, जेवण या सर्व सुविधा मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे, असे त्यांनी सांगितले.>विभागाला अधिक निधी मिळावावैद्यकीय शिक्षण विभागाला यापुढे प्राधान्याने जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून मी स्वत: आक्रमक भूमिका घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विभागाकडे १८ मेडिकल कॉलेज आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात ३,७५० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यातील ७० ते ७५ टक्के रक्कम २२ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होते. या रकमेतून औषध, यंत्रसामुग्री आणि रुग्णांच्या जेवणाचा खर्च भागवायचा आहे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस