मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची चाचणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:45+5:302021-05-05T04:32:45+5:30
१५ ते २० दिवसांपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मुंबई व पुण्याहून येणाऱ्या खासगी बसची संख्या कायम ...

मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची चाचणीच नाही
१५ ते २० दिवसांपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मुंबई व पुण्याहून येणाऱ्या खासगी बसची संख्या कायम आहे. त्यात दररोज किमान १०० ते १५० प्रवासी शहर व तालुक्यात येत आहेत. त्यात अनेक कामगार मजूर असून ते आपल्या पूर्ण साहित्यासह गावी येत आहेत. गतवर्षी बाहेरून येणाऱ्या सर्व व्यक्तींचे काही दिवस संस्थात्मक विलगीकरणा करण्यात येत होते. मात्र, सध्या अशी पद्धत दिसून येत नाही.
हे प्रवासी थेट आपल्या घरी जात आहेत. त्यात काही जण बाधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या वतीने या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात यावी, तसेच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
आरोग्य यंत्रणेवर ताण...
सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडलेला आहे. लवकरच खासगी बसमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड चाचणी करून त्यांना घरी पाठविण्यात येईल, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.