शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा; महापालिकेसाठी लढाई अटीतटीची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:27 IST

मागील लातूर महापालिकेची निवडणूक १९ एप्रिल २०१७ मध्ये झाली. त्यावेळी भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत होती

लातूर : महापालिकेच्या रणधुमाळीला प्रारंभ होण्यापूर्वी लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदर, राजकीय उलथापालथी घेऊन येणारी ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. १८ प्रभाग आणि ७० जागांसाठी मतदारांचे दार इच्छुक ठोठावत आहेत.

मागील लातूर महापालिकेची निवडणूक १९ एप्रिल २०१७ मध्ये झाली. त्यावेळी भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत होती. ७० पैकी ३६ नगरसेवक निवडून आल्याने भाजपा सत्तेत आली. त्यावेळी काँग्रेसनेही ३३ जागा जिंकून जोरदार टक्कर दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर होता. काठावरचे बहुमत घेऊन पहिल्या अडीच वर्षांत भाजपाचे महापौर आणि उपमहापौर सत्तेत राहिले. मात्र त्यानंतर भाजपाने मिळविलेल्या बहुमताला काँग्रेसने सुरुंग लावला. काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर झाले. तर हातमिळवणी करीत भाजपाचे चंद्रकांत बिराजदार उपमहापौर झाले. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीसह सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. २०१७ मध्येही स्वतंत्र लढले, आताही तोच कित्ता गिरवला जाण्याची दाट शक्यता आहे.

दोन्ही महापौरांनी पक्ष सोडलेमहापौर सुरेश पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला आहे. तर अडीच वर्षे महापौर राहिलेल्या विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे. सत्तेत राहिलेल्या दोन्ही महापौरांनी आपापले पक्ष सोडून नवीन घरोबा केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, गिरीश पाटील यांचे पक्षांतर चर्चेत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Party Switching Dominates Discussion; Municipal Election to be Tight!

Web Summary : Latur's municipal election sees intense party switching, overshadowing development discussions. All parties contest independently for 70 seats. Both former mayors defected, raising stakes. Congress faces key exits.
टॅग्स :Latur Municipal corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणुक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेस