लातूर जिल्ह्यातील १६८ गावांनी काेराेनाला राेखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:48+5:302021-04-20T04:20:48+5:30
अहमदपूर तालुक्यातील ५७, देवणी ४५, औसा २२, निलंगा १९, रेणापूर २५ आणि चाकूर तालुक्यातील ८५ गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव झाला ...

लातूर जिल्ह्यातील १६८ गावांनी काेराेनाला राेखले
अहमदपूर तालुक्यातील ५७, देवणी ४५, औसा २२, निलंगा १९, रेणापूर २५ आणि चाकूर तालुक्यातील ८५ गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव झाला नाही. जिल्ह्यात पहिला ७ एप्रिल २०२० राेजी बाधित आढळला हाेता. तेव्हापासून सुरक्षित अंतर, नियमित मास्क आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे काेराेनाला राेखण्यात या गावांना यश आले आहे.
गावातून बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना परत आल्यानंतर किमान पाच ते सहा दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. यातील बहुतांश ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला. आशा सेविकांनी घराेघरी जाऊन सर्दी, ताप, खाेकला लक्षणे असलेल्यांच्या नाेंदी घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवले. त्यामुळे या गावांमध्ये काेराेनाला येता आले नाही.
काेट
काेराेनाची लाट तीव्र असली तरी लातूर जिल्ह्यातील १६८ गावांनी काेराेनाला राेखले. ग्रामपंचायत, गावस्तरावरील कर्मचारी, अशा सेविका यांच्या संयुक्त प्रयत्नाचे हे यश आहे. त्यांनी राबविलेले उपक्रम अन्य गावांनी राबवावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- अभिनव गाेयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., लातूर
-