निलंगा, लातूर येथून दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:15 IST2021-04-29T04:15:04+5:302021-04-29T04:15:04+5:30

कचरा टाकण्याच्या कारणावरून मारहाण लातूर : तू पानटपरीचा कचरा माझ्या घरासमोर आणून टाकू नकोस असे म्हणत कचऱ्याच्या कारणावरून शिवीगाळ ...

Theft of two-wheelers from Nilanga, Latur | निलंगा, लातूर येथून दुचाकींची चोरी

निलंगा, लातूर येथून दुचाकींची चोरी

कचरा टाकण्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : तू पानटपरीचा कचरा माझ्या घरासमोर आणून टाकू नकोस असे म्हणत कचऱ्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना लातूर शहरातील मंठाळे नगर येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

फिर्यादी दत्ता बाबुअप्पा मिटकरी यांना पानटपरीचा कचरा घरासमोर आणून टाकू नकोस असे म्हणत शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यात आली. तसेच डोक्यात लोखंडी पाईपने मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचा भाऊ गेला असता त्यालापण डोक्यात, कपाळावर मारून जखमी केले. शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी दत्ता मिटकरी यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. पवार करीत आहेत.

संगनमत करून रॉडने मारहाण

लातूर : संगनमत करून घरासमोर झाडू मारण्याच्या कारणावरून, आपसात भांडण तक्रारी करून फिर्यादीच्या डोक्यात रॉडने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना कळंब रोड रेल्वे गेट येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी अनिल गोविंद वाडीकर यांना घरासमोर झाडू मारण्याच्या कारणावरून डोक्यात रॉडने मारून जखमी करण्यात आले. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. अनिल वाडीकर यांच्या तक्रारीवरून जयप्रकाशसिंग राजपुरोहित यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. बिराजदार करीत आहेत.

विहिरीवरील विद्युत वायरची चोरी

लातूर : मांजरा नदीच्या काठावरील गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या सरकारी विहिरीवर टाकलेले ३७ मीटर कॉपर विद्युत वायर बोर्डातून कट करून चोरून नेल्याची घटना २५ ते २६ एप्रिलच्या दरम्यान घडली. या प्रकरणी बोकनगावच्या ग्रामसेविका जयश्री आत्माराम तोडकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. तांबोळी करीत आहेत.

Web Title: Theft of two-wheelers from Nilanga, Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.