चंद्रनगर परिसरातून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:22+5:302021-03-27T04:20:22+5:30
लातूर : शहरातील चंद्रनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना १२ मार्च रोजी घडली. ...

चंद्रनगर परिसरातून दुचाकीची चोरी
लातूर : शहरातील चंद्रनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना १२ मार्च रोजी घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी रत्नदीप जानकीराम सरवदे यांनी आपली दुचाकी क्रमांक एमएच २५ एस २३२१ चंद्रनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर पार्किंग केली आणि कामासाठी ते बँकेत गेले. काम आटोपल्यानंतर बाहेर येऊन पाहिले असता, दुचाकी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी रत्नदीप सरवदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ गोसावी करीत आहेत. दरम्यान, शहरात दुचाकी चोरींचे सत्र सुरूच असून, याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकातून होत आहे.