महादेववाडी शिवारातून पाणबुडी मोटारची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:36+5:302021-02-05T06:25:36+5:30

कारची समोरासमोर धडक, वाघोली पाटी येथे अपघात लातूर - औसा-निलंगा रोडवरील वाघोली पाटीजवळ केए ३२ एन ०९३० या क्रमांकाच्या ...

Theft of a submarine from Mahadevwadi Shivara | महादेववाडी शिवारातून पाणबुडी मोटारची चोरी

महादेववाडी शिवारातून पाणबुडी मोटारची चोरी

कारची समोरासमोर धडक, वाघोली पाटी येथे अपघात

लातूर - औसा-निलंगा रोडवरील वाघोली पाटीजवळ केए ३२ एन ०९३० या क्रमांकाच्या आणि एमएच २५ एएल १७५४ या क्रमांकाच्या कारची समोरासमोर धडक झाली. एमएच २५ एएल १७५४ च्या कारचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एके ३२ एन ०९३० या क्रमांकाच्या कारला समोरून धडक दिली, असेकलाप्पा शरणाप्पा निटुरे (रा. नगराळ, ता. भालकी जि. बीदर) यांनी औसा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार एमएच २५ एल १७५४ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आहे. तपास पोहेकॉ फुलारी करीत आहेत.

दुचाकीची चोरी, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

लातूर - शहरातील शिवाजी चौक परिसरात पार्किंग केलेल्या एमएच २४ बीसी ८५४० या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. याबाबत परमेश्वर शिवाजी बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ भताने करीत आहेत.

ट्रकची दुचाकीला धडक

लातूर - तुळजापूर टी-पॉईंट ते औसा टी-पॉईंट रोडवर ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एमएच २४ बीई ७४२१ या क्रमांकाच्या ट्रकने एमएच २४ बीएच १३३७ या क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात फिर्यादी विठ्ठल कमलाकर लंजिले जखमी झाले. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. दुचाकीचेही नुकसान झाले, असे त्यांनी औसा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Theft of a submarine from Mahadevwadi Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.