घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:10+5:302021-06-04T04:16:10+5:30
उद्योग भवन येथून मोबाईलची चोरी लातूर : उद्योग भवन येथे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनातून २० हजार रुपयांच्या मोबाईलची चोरी ...

घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरी
उद्योग भवन येथून मोबाईलची चोरी
लातूर : उद्योग भवन येथे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनातून २० हजार रुपयांच्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना १९ मे रोजी घडली. याबाबत २ जून रोजी डॉ. संजय शिवराम बेंबडे (रा. नरेंद्रधाम कातपूर रोड, लातूर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक चामे करत आहेत.
घर वाटून देण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : शेत व घर वाटून देण्याच्या कारणावरून मंगरुळ येथे मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत रसूल नवाज सय्यद (रा. मंगरुळ, ता. जळकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबू नवाज सय्यद व अन्य तिघांविरुद्ध जळकोट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विटा रचण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची परस्परविरोधी फिर्याद बाबू नवाज सय्यद यांनी जळकोट पोलिसात दिली आहे. त्यानुसार रसूल नवाज सय्यद व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपचुंदा येथून दुचाकीची चोरी
लातूर : औसा तालुक्यातील अपचुंदा येथे पार्किंग केलेल्या (एमएच १३ डीबी ५२७७) क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. ही दुचाकी घरासमोर पार्किंग केली होती. याप्रकरणी नारायण बाजीराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझाद चौकातून दुचाकीची चोरी
लातूर : आझाद चौकातून हमिद दस्तगीर शेख यांच्या (एमएच २४ आर ९९०७) क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक अनंतवाड करत आहेत.
वाद मिटविण्यास गेल्याने मारहाण
लातूर : चिंचोली भंगार येथे वाद मिटविण्यास गेले असता, दोघांना मारहाण करण्यात आली. याबाबत शिवशंकर वैजनाथ हत्ते (रा. चिंचोली भंगार, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ कलाप्पा लांडगे व अन्य एकाविरुद्ध कासारशिरसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत.