घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST2021-04-28T04:21:01+5:302021-04-28T04:21:01+5:30
पैसे घेण्या-देण्याच्या कारणावरून मारहाण लातूर : पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून फिर्यादी तसेच त्यांची पत्नी, मुलगी व मुलास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी ...

घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
पैसे घेण्या-देण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून फिर्यादी तसेच त्यांची पत्नी, मुलगी व मुलास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना लातूर तालुक्यातील बोपना येथे घडली. याबाबत नजीर अहेमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सत्तार मौला सय्यद व अन्य पाच जणांविरुद्ध मुरुड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मुंडे करीत आहेत.
शेतात खड्डा खोदण्यावरून मारहाण
लातूर : शेतात खड्डा करीत असलेल्या ठिकाणी येऊन तू येथे खड्डा का करीत आहेस म्हणून फिर्यादी लक्ष्मण ग्याना तिगोले (रा. बारा नंबर पाटी, ता. लातूर) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच माझ्या शेतातून जायचे नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली, असे लक्ष्मण तिगोले यांनी मुरुड पोलिसात म्हटले आहे. त्यानुसार संजय बब्रुवान तिगोले (रा. हरंगुळ बु.) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चोरट्यांकडून भिंतीवरील घड्याळाची तोडफोड
लातूर : जि. प. शाळा रेणापूर परिसरातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात काही न मिळाल्याने टेबलावरील काच व भिंतीवरील घड्याळाची तोडफोड करण्यात आली. यात ५ हजारांचे नुकसान झाले, असे कनिष्ठ सहायक लिपिक शुभम अरुण कांबळे यांनी रेणापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोसइ. गुळभिले करीत आहेत.
निटूर येथे घरात घुसून एकाला मारहाण
लातूर : दारात बसल्याच्या कारणावरून फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ करून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना निटूर येथे घडली. याबाबत शिवसांब माधव कनशेट्टे (रा. निटूर, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमेश्वर प्रभुअप्पा कनशेट्टे याच्याविरुद्ध कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. कांबळे करीत आहेत.