मार्केट यार्डातून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:33+5:302021-05-08T04:20:33+5:30
माझ्या वडिलाला का मारलेस म्हणून मारहाण लातूर : माझ्या वडिलाला दोन दिवसांपूर्वी घरात घुसून का मारलेस म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण ...

मार्केट यार्डातून दुचाकीची चोरी
माझ्या वडिलाला का मारलेस म्हणून मारहाण
लातूर : माझ्या वडिलाला दोन दिवसांपूर्वी घरात घुसून का मारलेस म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून मुक्का मार दिल्याची घटना सुनेगाव शेंद्री येथे घडली. याबाबत व्यंकोबा विश्वनाथ जायभाये (वय ५४, रा. सुनेगाव शेंद्री, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधाकर जायेभाये व अन्य तिघांविरुद्ध (सर्व, रा. सुनेगाव शेंद्री) यांच्याविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास गोखरे करीत आहेत.
काळी-पिवळी जीपची दुचाकीला धडक
लातूर : भरधाव वेगातील काळी पिवळी (एमएच २६ बी ९२७५) चालकाने अहमदपूर येथील एलआयसी ऑफिससमोर (एमएच २४ बीई ९२३५) दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात फिर्यादीस मुक्का मार लागला आहे. तसेच त्यांच्या मुलाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. याबाबत बालाजी गणपत लाड (रा. बसवेश्वर नगर, नांदेड रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळी पिवळी(एमएच २६ बी ९२७५) चालकाविरुद्ध अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नुकसानीचा खर्च दे म्हणून मारहाण
लातूर : गैरकायद्याची मंडळी जमवून माझ्या मोटारसायकलच्या नुकसानीचा खर्च दे म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत निशिकांत नंदकुमार देशमुख (रा. विक्रम नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहटेकर (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य पाचजणांविरुद्ध कलम १४३, ३२४, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख करीत आहेत.