शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेकवळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमाळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
4
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
5
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
6
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
7
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
8
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
9
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
10
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
11
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
12
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
13
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
14
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
15
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
17
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
18
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
19
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
20
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!

सारे गाव हळहळले, दोन सख्ख्या बहिणींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार, विहिरीत बुडून झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 12:40 IST

दोन्ही सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती.

भालकी (जि. बीदर) : भालकी तालुक्यातील आट्टरगा गावात दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अंकिता गोविंदराव मोरे (१३), श्रध्दा गोविंदराव मोरे (१५) यांचा मृत्यू झाला आहे.

मुलींची आई शेताकडे गेली असता तिला विहिरीच्या वरच्या बाजूस मुलींच्या चपला आणि ओढणी दिसली. तेव्हा शोधाशोध केली, परंतु मुली कुठे आढळून आल्या नाहीत. ही माहिती कुटुंबीयांना कळविल्यावर गावातील लोक धावत आले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन्ही बहिणींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. भालकी येथील शासकीय रुग्णालयात दोन्ही मयतांचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी भालकीचे पोलीस उपाधीक्षक जेम्स मॉनिजेस, सर्कल इन्स्पेक्टर वीरना दोडमनी, मेहकरचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत कारंजे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एकाच चितेवर दोघींचे अंत्यसंस्कार...दोन्ही सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यावर प्रेत नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले. बुधवारी दुपारी दोन्ही बहिणींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ, आजी असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर