शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश

By संदीप शिंदे | Updated: July 20, 2024 19:01 IST

लातूर जिल्ह्यात २१५ शाळांत १८६५ जागा आहेत

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. न्यायालयीन निकालामुळे यंदाच्या प्रक्रियेस स्थगिती मिळाली होती. दरम्यान, आता आरटीईच्या संकेतस्थळावर निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून, सोमवारपासून पालकांना निवडीचे संदेश पाठविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात आरटीईसाठी २१५ शाळांची नोंदणी असून, यामध्ये १८६५ जागा आहेत. यंदा ५ हजार ७६५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. दरम्यान, राज्यस्तरीय सोडतीत १७९६ बालकांची निवड झाली असून, सोमवारपासून संदेश येणार आहेत. त्यांना २३ ते ३१ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करुन निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. शिक्षण विभागाने यंदाच्या आरटीईसाठी नवीन नियामवली जाहीर केली होती. यामध्ये खासगी शाळांना वगळण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. अखेर न्यायालयाने शासनाची नवीन नियमावली रद्द ठरविली असल्याने प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. सोडतीची निवड व प्रतीक्षा यादी शनिवारपासून संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता सोमवारपासून आरटीई मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यांना तालुकास्तरावरील निवड समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन संबधित शाळेत ३१ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

६९ जागांवर सोडत बाकी...जिल्ह्यात आरटीईसाठी २१५ शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये १ हजार ८६५ जागा असून, सोडतीमध्ये १७९६ बालकांची निवड झाली आहे. तर ६९ जागांवर सोडत काढण्यात आलेली नाही. तसेच ३१ जुलैपर्यंत प्रवेश न घेतलेल्या जागेवर प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होऊन महिना उलटला असल्याने लवकरात लवकर आरटीईची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यावर शिक्षण विभागाचा भर राहणार आहे.

कागदपत्रांची पडताळणी केली जाणार..आरटीई प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी हे समितीचे अध्यक्ष राहणार असून, केंद्रप्रमुख, शासकीय, विनानुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी हे सदस्य राहणार आहेत. विस्तार शिक्षण अधिकारी हे सदस्य सचिव राहणार असल्याचे शिक्षण संचालकांनी कळविले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूरRight To Educationशिक्षण हक्क कायदा